एमएलएमच्या नावाखाली कोटींची फसवणूक; पाच वर्षांपासून फरार दोन मुख्य आरोपी जेरबंद

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मल्टी लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) योजनेद्वारे आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना सिडको पोलिसांनी जालन्यात जेरबंद केले. हे दोघे जण जालना येथील एका हॉटेलमध्ये नवीन कंपनीच्या माध्यमातन प्रशिक्षण
आणि दिवाळी सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सिडको पोलिसांनी या दोन्ही ठगांच्या आवडीच्या स्टाईलमध्येच त्यांना बेड्या ठोकल्या. श्याम साहेबराव कवडे (३५, रा. गायगव्हाण, ता.
घनसावंगी, जि. जालना) आणि संतराम जनार्दन कणके (५४, रा. भांबरी, ता. अंबड) अशी अटक करण्यात झालेल्या आरोपींची नावे असून त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. २०१८ मध्ये आरोपी श्याम कवडे आणि संतराम कणके यांनी कंपनीचे संचालक संजय दुसाणे व मीरा दुसाणे यांच्यासोबत मिळून दिशा टोटल मार्केटिंग सोल्यशन प्रा.
लि. या कंपनीची चेन मार्केटिंग योजना सुरू केली होती. योजनेत ८ हजार ४९९ रुपये भरून नोंदणी करणे आणि त्यानंतर सलग ५२ आठवडे दर आठवड्याला १ हजार रुपयांचे रिपर्चेस केल्यास प्रत्येक आठवड्याला दुप्पट इन्सेंटिव्ह व वर्षभरात एकूण ७ लाख ६६० रुपये परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. सिडको एन-६ येथील चंद्रकांत भगवानराव जगताप (३०) यांचीही फसवणक करण्यात आली होती.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions